बारामती ऍग्रो कंपनी च्या नावाने फसवण्याचा प्रयत्न करणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात
आरोपी याला दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे.
बारामती ऍग्रो कंपनी च्या नावाने फसवण्याचा प्रयत्न करणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात
आरोपी याला दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती ऍग्रो कंपनी चे शेअर्स ताबडतोब खरेदी करा भविष्यात बारामती ऍग्रो कंपनी चे शेअर्स खूप महाग होणार आहेत.
अशा प्रकारची जाहिरात. टेलिग्राम ॲप वर निफ्टी ऑप्शन ट्रेड ग्रुप टाकण्यात आली सदरचा ग्रुप रुपेश दत्तात्रय काळे याने बनवला होता या ग्रुपला जवळ जवळ पाच हजार लोक संपूर्ण भारत व महाराष्ट्राचे जोडलेले आहेत.
ते शेअर्स खरेदी करण्यासाठी त्याच्याशी संपर्क करुन त्याच्याकडे पैसे भरा असे हा भामटा सांगत होता. सदरची बाब बारामती ऍग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर प्रफुल्ल बाळासाहेब तावरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की बारामती ऍग्रो कंपनीचे शेअर्स कधीही ओपन मार्केटमध्ये विकले जात नाहीत व त्याची सध्या खरेदी-विक्री सुद्धा होत नाही.
तरी याप्रकारे कुणीतरी कंपनीचे रेपुटेशन खराब करून लोकांकडून फसवून पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहे.
अशाप्रकारची फिर्याद दिली रुपेश काळे याने त्याचा ग्रुप वर दिलेला जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सदर इस माझे कोणतेही कार्यालय अस्तित्वात असल्याचे दिसून आले नाही.
तसेच त्याचा पत्ता सुद्धा खोटा होता. केवळ तांत्रिक पुराव्याच्या आधारे व त्याचा उपलब्ध असलेला मोबाईल यांच्याशी संपर्क ठेवून सदर आरोपीला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके. अजित राऊत दशरथ इंगोले यांनी पुण्यात शिवाजीनगर या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. चौकशीअंती सदर आरोपी याच्यावर कोल्हापूर वागळे इस्टेट ठाणे हडपसर या ठिकाणी पूर्वी लोकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
तरी यापुढे अशा कोणत्याही फसव्या जाहिराती वर खात्री केल्याशिवाय लोकांनी विश्वास ठेवू नये. सदर आरोपी याला दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.