कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; जेजे रुग्णालयात भरती
3 मार्च पर्यंत न्यायालयाने मलिकांना ईडी कोठडी सुनावली आहे.
कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; जेजे रुग्णालयात भरती
3 मार्च पर्यंत न्यायालयाने मलिकांना ईडी कोठडी सुनावली आहे.
मुंबई, प्रतिनिधी
मनी लॉड्रींग प्रकरणात राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. ईडीने तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन मार्चपर्यंत, मलिकांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान,नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले आहे मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवाब मलिक यांच्या 3 मागण्या कोर्टाकडून मान्य
ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयासमोर तीन मागण्या केल्या होत्या नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या आहेत. आपल्याला घरचे जेवण आणि औषधी मिळावी अशी मागणी मलिक यांनी केली होती. ती मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे.