राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा
सध्या त्या केंद्रिय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद इथं कार्यरत आहेत.
राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा
सध्या त्या केंद्रिय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद इथं कार्यरत आहेत.
पुणे :प्रतिनिधी
राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांनी चौकशीचा फास आवळला असून पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग केल्या प्रकरणी न्यायालयात वाद सुरू असतानाच आता पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.
रश्मी शुक्लांनी घेतली होती हायकोर्टात धाव
फोन टॅपिंग प्रकरणात मागे दोन वेळा सायबरकडून चौकशीला हजर राहण्या संदर्भात समन्स रश्मी शुक्ला यांना बजावण्यात आले होते. पण, दोन्ही वेळा कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी टाळाटाळ केली होती. एवढंच नाहीतर ईमेल द्वारे प्रश्न पाठवावे, त्याची उत्तरं देते, अशी मागणीही शुक्ला यांनी केली होती.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा आरोप आहे. सध्या त्या केंद्रिय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद इथं कार्यरत आहेत.
याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षीकाही फोन टॅपिंग केले होते. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर हा राजकीय मुद्दा बनला.