आताची मोठी बातमी ! शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय -हायकोर्टाचा निकाल जाहीर
सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या आदेशानुसार या प्रकल्पासाठी विविध परवानग्या देण्यात आल्या

आताची मोठी बातमी ! शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय -हायकोर्टाचा निकाल जाहीर
सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या आदेशानुसार या प्रकल्पासाठी विविध परवानग्या देण्यात आल्या
प्रतिनिधी
लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टानं निकाली काढली
मात्र सध्याच्या स्थितीत तिथलं बांधकाम पाडण्याचे निर्देश देता येणार नाहीत – हायकोर्टात
लवासासाठी कायद्यात नव्यानं केलेल्या तरतूदींना आव्हान देत एड. नानासाहेब जाधव यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय, असेही हायकोर्टाने या याचिकेच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी कोणत्याही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत हे मान्य असल्याचे हायकोर्टाने सांगितले.
लवासा प्रकल्पाला विरोध करणा-या जनहित याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर केला आहे. लवासा प्रकल्पाबाबत केलेले आरोप योग्य आहेत, मात्र ते करायला बराच उशिर झाला आहे. मात्र सध्याच्या स्थितीत तिथलं बांधकाम पाडण्याचे निर्देश देता येणार नाहीत, असेही हायकोर्टातने स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकल्पात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मालकीच्या कंपनीने सुरुवातीला गुंतवणूक केली होती. त्यामुळे प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या आदेशानुसार या प्रकल्पासाठी विविध परवानग्या देण्यात आल्या, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.