इंदापूर

पुणे जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत झाली महत्वपूर्ण चर्चा

पुणे जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत झाली महत्वपूर्ण चर्चा

इंदापूर : प्रतिनिधी

पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी (दि.२६) पुणे शहर भाजपा कार्यालय, याठिकाणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकींसंदर्भात व विविध विषयांवर चर्चा झाली.या मिटिंग मध्ये जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे संयोजक जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके, जिल्‍हा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब गावडे, विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे हे उपस्थित होते.

Back to top button