शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, राज्यपालांनी दिले कारवाईचे आदेश
अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवधन पुंडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, राज्यपालांनी दिले कारवाईचे आदेश
अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवधन पुंडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
प्रतिनिधी
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी 94 लाख रुपयांच्या शासन निधीची अफरातफर केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने अकोला पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या संदर्भामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, नियमानुसार पालकमंत्र्यांवर किंवा कोणत्याही मंत्र्यांवर चौकशी करण्यासाठी राज्यपाल यांची परवानगी लागते. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 21 फेब्रुवारीला अकोला पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ मा. राज्यपाल यांना भेटून बच्चू कडू यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती.
त्यानुसार २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य भगतसिंहजी कोशियारी यांनी अकोला पोलीस अधिक्षक यांना बच्चू कडु यांच्या विरूध्द योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे आदेश व मा. अकोला न्यायालय यांनी नोंदविलेले मत विचारात घेता अकोला पोलीस अधिक्षक यांनी तातडीने बच्चू कडु यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करून चौकशी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलीय.
काय आहे प्रकरण?
शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.