बारामती शहरात संशयिता कडून गावठी पिस्तूल व पाच काडतुसे जप्त.
आरोपी विरुद्ध रेडींग पार्टीमधील दशरथ कोळेकर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केलेला आहे
बारामती शहरात संशयिता कडून गावठी पिस्तूल व पाच काडतुसे जप्त.
आरोपी विरुद्ध रेडींग पार्टीमधील दशरथ कोळेकर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केलेला आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख व अपर पोलीस अधीक्षक माननीय मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दलास अवैध अग्निशस्त्र जप्त करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत .
या अग्नी शास्त्रांचा जर वापर झाला तर लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. म्हणून याबाबत अग्रक्रम देण्याबाबत आदेश वरिष्ठ देत असतातवरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कामकाज करत असताना पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की दिनांक 27 फेब्रुवारी रोजी 3.00 वाजण्याच्या सुमारास पाटस रोड देशमुख चौक येथे इनामदार कॉर्नर समोर एक संशयित इसम थांबलेला आहे व त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल लावलेला आहे.
अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे कल्याण खांडेकर तुषार चव्हाण गौरव ठोंबरे शाहू राणे अभिजीत कांबळे यांना बोलून सदर ठिकाणी जाऊन पाहणी करण्यास सांगितले असता बातमीप्रमाणे सदर ठिकाणी एक इसम कमरेला गावठी कट्टा लावलेल्या स्थितीत मिळून आला .
पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी चोहोबाजूंनी एकाच वेळी घेराव घालून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीस हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे मॅक्झिन असलेले देशी पिस्टल ज्याची मूठ दोन्ही बाजूने चॉकलेटी रंगाची प्लास्टिक लावून बनवलेली आहे असे मिळाले व त्याच्या खिशात पाच जिवंत काडतुसे किंमत पाचशे रुपयाची मिळाले सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र उर्फ बनु हुकुमचंद यादव वय सत्तावीस वर्ष राहणार हांडिया खेडा तालुका खांडवा मध्यप्रदेश असे असल्याचे सांगितले सदर इसम या भागांमध्ये अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेला असावा असा पोलिसांचा संशय आहे सदर इसमावर गुन्हा न 105 /22 कलम 3 25 आर्म ॲक्ट दाखल करून तो कोणास विक्री करण्यासाठी आला होता व त्याने अद्याप पर्यंत किती अग्निशस्त्र विकलेली आहेत याबाबत तपास करत आहेत.
सदर इसमाला जास्तीत जास्त पोलिस कोठडी रिमांड मिळण्यासाठी त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.