महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;आता इतक्या रुपयांना मिळणार सिलेंडर
1 मार्चपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;आता इतक्या रुपयांना मिळणार सिलेंडर
1 मार्चपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे.
नवी दिल्ली,प्रतिनिधी
युक्रेन-रशिया युद्धामुळे पेट्रोलियमच्य किंमती वाढतच आहेत. त्यामध्ये आता कमर्शियल सिलिंडर भाववाढीची भर पडली आहे. 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
5 किलो सिलेंडरचा दर 27 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत 5 किलो सिलेंडरचा दर 569 रुपये झाला आहे.मागील महिन्यात फेब्रुवारी 2022 मध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांची कपात झाली होती. मात्र या महिन्यात तब्बल 105 रुपयांची वाढ झाली.
घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थे
सध्या कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे.
दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅसच्या किंमती 105 रुपयांनी वाढून 2012 रुपये झाल्या आहेत. याआधी दर 1907 रुपये होता.
मुंबईत कमर्शियल गॅसचा दर 1963 रुपये झाला आहे. आधी हा दर 1857 रुपये होता. मुंबईत 106 रुपयांची वाढ झाली आहे.
14 किलोग्रॅम सिलेंडरचा दर –
दिल्लीत विना सब्सिडी 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचा दर 899.50 रुपये आहे. मुंबईतही घरगुती गॅसचा दर 899.50 रुपये आहे.
घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही शहरातील सिलेंडरचा दर तपासू शकता.
भारतात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याला ठरवल्या जातात.