चार महिन्यांपूर्वी पितृछत्र हरपलेल्या मुलीचे समाजबांधवच बनले पालक ; तब्बसुमला दिला आधार
लोकसहभागातून या सोहळ्याचा खर्च उचलण्यात आला.
चार महिन्यांपूर्वी पितृछत्र हरपलेल्या मुलीचे समाजबांधवच बनले पालक ; तब्बसुमला दिला आधार
लोकसहभागातून या सोहळ्याचा खर्च उचलण्यात आला.
बारामती वार्तापत्र
लक्ष्मी नारायणनगर कसबामधील भाजी विक्रेते फारूक तांबोळी यांचा दि.१३) नोव्हेंबर २०२१ रोजी शनिवारी एका मनोरुग्णाच्या हल्ल्यात भाजीविक्रेते फारुक ( चाचा ) तांबोळी यांचा मृत्यू झाला होता. फारुकचाचांच्या घरात ते एकटेच कमावते होते.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला. मात्र, मानवतावादी नागरिक, तांबोळी समाज बांधवांनी पुढे येत त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा खर्चासह पार पाडला.
नोव्हेंबर २०२१ मध्ये फारूक तांबोळी यांच्यावर मनोविकृताने दारूसाठी पैसे न दिल्याने हल्ला केला होता.त्यात जखमी झालेल्या फारूक तांबोळी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तांबोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तीन मोठ्या मुलींसह एक लहान मुलगा, पत्नी असे कुटुंब त्यांच्या पश्चात होते.त्यांची मोठी मुलगी तब्बसूमहिचाविवाहम्हस्कोबाचीवाडी येथील समीर यांच्याशी ठरला.
अशा परिस्थितीत त्यांचा समाज त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभा राहिला. फारूक यांची मोठी मुलगी तब्बसुम हिचा विवाह म्हस्कोबाची वाडी येथील मुलगा समीर याच्याशी ठरला, घरात करता माणूस नसल्याची उणीव- जाणवत असताना अंजुमन इत्तेहाद जमात बारामतीने विवाहाचा सगळा खर्च उचलला. या विवाह सोहळ्यासाठी बारामती शहर पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी
दोन्ही दांपत्याना आशिर्वाद देऊन मार्गदर्शन केले.
सोहळ्यासाठी २० हजार रुपयांची मदत पिंपरी चिंचवड तांबोळी जमातचे अध्यक्ष ताजुदिन तांबोळी, पदाधिकाऱ्यांनी दिली.
तांबोळी जमात पुणे शहराध्यक्ष नजीर धायरीवाले यांनी दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपये रोख मदत दिली.
सोहळ्यासाठी सर्व नियोजन पुढाकार घेऊन बारामती तांबोळी समाजाचे अध्यक्ष मुनीर तांबोळी, कार्यकारिणी सदस्य जावेद तांबोळी, बशीर तांबोळी, अफजल तांबोळी, युसुफ तांबोळी, इम्रान तांबोळी, असलम तांबोळी, जहागीर तांबोळी, आरीफ तांबोळी,तोसीव तांबोळी, अरबाज तांबोळी, ज्येष्ठ मार्गदर्शक मस्जिद तांबोळी, कबीर तांबोळी, रशिद तांबोळी, राजू तांबोळी, रमजान तांबोळी यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माणुसकीरुपी विवाह सोहळा पार पडला.