मुखप्रष्ठा

राजकीय घडामोडींना वेग,फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ, गृहमंत्री पोहोचले शरद पवारांच्या घरी!

तिन्ही पक्षाचे नेते बॅकफुटवर

राजकीय घडामोडींना वेग,फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ, गृहमंत्री पोहोचले शरद पवारांच्या घरी!

तिन्ही पक्षाचे नेते बॅकफुटवर

मुंबई, प्रतिनिधी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत व्हिडिओ बॉम्ब टाकला. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी  पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला.

तिन्ही पक्षाचे नेते बॅकफुटवर गेले आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे तातडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबद्दल विचारणा केली असता, मी अजून पेन ड्राईव्ह पाहिलेला नाही. त्यामुळे आता काहीही बोलता येणार नाही. याबद्दल सभागृहामध्ये उत्तर देईल, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

त्यानंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याकरता सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काय आहे फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब!

सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे.

शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे.

ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलीस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.

‘पवार साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. त्यासाठी त्यांनी कशी कबुली दिली, याचे संपूर्ण तपशील त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहेत.

मीडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या, आधीच ठेवलेल्या पुराव्यांचे चित्रीकरण कसे करायला लावायचे, याचेही तपशील त्यात आहेत. पुरावे प्लांट करताना कुठेही कॅमेरे नाहीत, यासाठी आधीच रेकी कशी करण्यात आली, याचीही कबुली ते देत आहेत.

तसंच, अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवादही आहेत, फोन कॉल्स आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी-बैठकी याचे इत्यंभूत तपशील त्यात आहेत. साहेब, कसे कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत आणि उगाच पोलीस स्टेशन डायरीत नोंद नको, म्हणून पडद्याआडून काय-काय निर्देश देतात, याची संपूर्ण कथा त्यांनी सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे-कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचेही तपशील फडणवीस यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram