स्थानिक
बारामतीत भाजप कार्यकर्त्यानी फटाके, लाडू वाटत केला जल्लोष साजरा..
भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत चौक दणाणून सोडला

बारामतीत भाजप कार्यकर्त्यानी फटाके, लाडू वाटत केला जल्लोष साजरा..
भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत चौक दणाणून सोडला
बारामती वार्तापत्र
पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपनं जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपनं आपला करिष्मा कायम ठेवलाय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय.
उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड चार राज्यात भाजपला मोठं यश मिळालंय… यामुळे आज देशभर जल्लोष साजरा केला जातोय बारामतीत देखील भाजप कार्यकर्त्यांनी भिगवण चौकात फटाके, लाडू, वाटत आणि ढोल ताशा वाजवत जल्लोष साजरा केलाय.. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत चौक दणाणून सोडला…