उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विक्रम रेकॉर्ड मोडला;नोएडामधून राजनाथ सिंह यांच्या मुलाचा 2.44 लाख मताधिक्याने विजय
विधानसभा निवडणुकीत आजवरचा देशातील सर्वात जास्त मतांचा विजय आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विक्रम रेकॉर्ड मोडला;नोएडामधून राजनाथ सिंह यांच्या मुलाचा 2.44 लाख मताधिक्याने विजय
विधानसभा निवडणुकीत आजवरचा देशातील सर्वात जास्त मतांचा विजय आहे.
प्रतिनिधी
भाजपचे पंकज सिंह यांना 70.84 टक्के मतं मिळाली आहेत. पंकजा सिंह यांच्या विरोधात उभे असणारे सपाच्या उमेदवाराला 62 हजार 722 मते मिळाली होती. विधानसभा निववडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे. या आधी महाराष्ट्रातून अजित पवारांचा 1 लाख 65 हजार मतांच्या फरकारने विजय मिळवला होता.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पारंपारिक बारामती या मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकावेळी 1 लाख 65 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते.
दरम्यान, अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत अनेकदा नवनवे रेकॉर्ड मोडले आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत ते तीनवेळा विक्रमी मताधिक्यांनी निवडून आले आहेत. याशिवाय त्यांनीच त्यांचे रेकॉर्ड मोडत नवे विक्रम उभे केले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात पंकज सिंह यांनी सर्वाधिक मतांनी जिंकून अजित पवारांचा रेकॉर्ड मोडला आहे.
पंकज सिंह यांनी मानले जनतेचे आभार