
खळबळजनक !बारामतीत अंथूर्णेच्या इसमाचा मृतदेह आढळला
पोलिसांकडून अधीकचा तपास सुरु
क्राईम; बारामती वार्तापत्र
बारामती लगत असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील एका ३५ वर्षीय इसमाने स्वतःच्याच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि आज सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास जळोची स्मशान भूमीच्या मागे एका जळालेल्या अवस्थेतील पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या इसमाची ओळख पटवायचा प्रयत्न केला असता.
अभिजित विजय खरात वय 35 वर्षे राहणार अंथुर्णे तालुका इंदापूर व सध्या श्रीराम नगर बारामती येथे राहत असून तो औषधाच्या दुकानात कामाला असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान त्या इसमाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक करत आहेत.तर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे.