स्थानिक

ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून लढा उभारू: सचिन शाहीर

ओबीसी आरक्षण साठी संघटन बळकट करणार

ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून लढा उभारू: सचिन शाहीर

ओबीसी आरक्षण साठी संघटन बळकट करणार

बारामती वार्तापत्र

ओबीसी आरक्षण धोक्यात असताना जात पात न मानता युवक युवतींनी एकत्र येऊन काम केले पाहिजे त्या साठी ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून लढा उभारू असे प्रतिपादन सचिन शाहीर यांनी केले.

सचिन शाहीर यांची राज्य कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यावर आयोजित सत्कार समारंभ मध्ये बोलत होते जानेवारी मध्ये नियुक्ती झाल्यावर प्रथमच बारामती मध्ये सत्कार समारंभा चे आयोजन पेन्सील चौक येथे करण्यात आले होते यावेळी ओबीसी सेवा संघ व तालुका व शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्तीत होते.

या तीन महिन्यात राज्यात विविध पदावर तरुणांना पाच हजार नियुक्त्या दिल्या असून आता राज्यात ३६ हजार नियुक्त्या करून ओबीसी आरक्षण साठी संघटन बळकट करणार असून राज्यभर झंझावाती दौरा करून आरक्षण ची दशा व दिशा आणि आरक्षण का पाहिजे? या विषयावर प्रबोधन करणार असल्याचे सचिन शाहीर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

Back to top button