वसीम बागवान मित्र परिवार आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विविध क्षेत्रातील महिलांचा केला गुण गौरव
वसीम बागवान मित्र परिवार आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विविध क्षेत्रातील महिलांचा केला गुण गौरव
इंदापूर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या निम्मिताने सामाजिक कार्येकर्ते वसीम बागवान मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर व्यंकटेश नगर प्रभाग क्र.५ येथे आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरील कार्यक्रम ठिकाणी कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
इंदापूर शहरातील सामाजिक कार्येकर्ते वसीम बागवान यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात कष्टकरी, होतकरू महिलांना साड्या वाटप करून महिलांना आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले.तसेच आरोग्य सेविका, महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका, महिला डॉक्टर, नगर परिषद महिला कर्मचारी यांना महिला कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यांबरोबरच इयत्ता १० वी १२ उत्तीर्ण विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.
सदरील होम मिनिस्टर स्पर्धेत वैशाली चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक रोहिणी जाधव, तृतीय क्रमांक गुलफम काझी, चतुर्थ क्रमांक मरिहम खातून यांनी पाठकावला यांना अनुक्रमे पैठणी, डिनर सेट, मिक्सर, कुकर ही बक्षीसे देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी महिला स्पर्धेकांना विशेष आकर्षक बक्षीसे देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना वसीम बागवान म्हणाले की, महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात स्त्रियांचे कर्तुत्व वंदनीय आहे. समाज विकासाच्या या प्रक्रियेत आजही सावित्रीच्या अनेक लेकी वेगवेगळ्या सेवेत आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि यापुढे दरवर्षी जागतिक महिला दिनी कार्यक्रम राबविण्यात येईल.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन मैत्रिणी ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधा गारटकर यांनी केले. यावेळी शोभा भरणे, रा.काँ. महिला शहराध्यक्षा उमा इंगुले, कार्याध्यक्षा स्मिता पवार, मालन पवार, माया चौधरी,सुरेखा उत्तेकर, अनिता पवार, शोभा बनसोडे, रेश्मा यादव, मयुरी इंगळे, सोनम जमदाडे, ऋतुजा यादव,फिरदोस आत्तार यांसह अनेक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरज बनसोडे व माधुरी मिसाळ यांनी केले.