अनेकान्त स्कूलचा दहावीचा १०० % निकाल
काही विद्यार्थ्यांस मराठी, संस्कृत ,गणित या विषयांमध्ये पैकीचे पैकी गुण मिळाले आहेत.
अनेकान्त स्कूलचा दहावीचा १०० % निकाल
काही विद्यार्थ्यांस मराठी, संस्कृत ,गणित या विषयांमध्ये पैकीचे पैकी गुण मिळाले आहेत.
बारामती वार्तापत्र
दि.१४/०३/२०२२ , २०२१-२२ चा सी.बी.एस.ई. दहावीचा प्रथम सत्र परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक ११ मार्च रोजी जाहीर करण्यात आला.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेचे निकाल चांगले नोंदवले गेले आहेत. यामध्ये अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. स्कूलचा प्रथम सत्र बोर्ड परीक्षेचा प्रथम बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
स्कूलचे एकूण ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये प्रथम क्र. वेदांत मुखेकर ९८% , द्वितीय क्र. शुभ अहिरे ९२% , तृतीय क्र. निशा करडे ९१.६% असे प्रथम तीन क्रमांक आहेत.
तसेच काही विद्यार्थ्यांस मराठी, संस्कृत ,गणित या विषयांमध्ये पैकीचे पैकी गुण मिळाले आहेत. ते विद्यार्थी खालील प्रमाणे :वेदांत मुखेकर – गणित ५० , संस्कृत ५० सोहम नवले मराठी ५ गार्गी कुलकर्णी संस्कृत ५० स्कूलच्या मुख्याध्यापिका राखी माथुर यांनी आपल्या शाळेचा १०० % निकाल लागल्याचे सांगितले. कोरोना साथीच्या काळातही अशी कामगिरी करणे हे विद्यार्थी व शिक्षक यांच्या मेहनतीशिवाय शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले .
स्कूलचे अध्यक्ष मिलिंद शहा (वाघोलीकर) सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका राखी माथुर, समन्वयिका स्मिता ढवळीकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक वर्ग व पालक यांचे अभिनंदन केले.