इंदापूर येथे रक्तदान शिबिरामध्ये १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजीराजे यांना केले अभिवादन

इंदापूर येथे रक्तदान शिबिरामध्ये १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजीराजे यांना केले अभिवादन
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व युवा क्रांती प्रतिष्ठानच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वर व सहयोगी संस्था यांच्या वतीने महादान ७.० अंतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन केले.
इंदापूर येथील प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या मंगल कार्यालयात आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव माळूंजकर, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताप, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इंन्द्रेश्वरचे अध्यक्ष सागर शिंदे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुक्यातील विविध सामजिक संघटना, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सामजिक कार्यकर्ते, रोटरी व रोट्रक्ट क्लबचे पदाधिकारी व सदस्य, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला तर लिनेन्स क्लबच्या वतीने अध्यक्षा उज्ज्वला गायकवाड, उपाध्यक्ष कल्पना भोर, सचिव सुनंदा अरगडे, कॅबिनेट सायरा आतार, सदस्य वंदना देवकर यांनी शुभेच्छा दिल्या.