प्रवीण दरेकर यांना दिलासा,सोमवारपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश
दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण दरेकर यांना दिलासा,सोमवारपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश
दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.
मुंबई :प्रतिनिधी
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांनी मजूर वर्गातून निवडणूक लढविली यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
मुंबई बँकेची मध्यवर्ती शाखा फोर्ट परिसरात आहे. त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. उच्च न्यायालयाने प्रवीण दरेकर यांचा अर्ज फेटाळून लावताना सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती.
आज पुन्हा एकदा या प्रकरणी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज सत्र न्यायालयात सरकारी वकीलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत दरेकर यांना अटक करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.