महाविकास आघाडीची एमआयएमसोबत युती शक्य नाही,संजय राऊत भूमिका स्पष्ट ,तिघात चौथा नकोच
भेट झाली म्हणजे आघाडी होत नाही

महाविकास आघाडीची एमआयएमसोबत युती शक्य नाही,संजय राऊत भूमिका स्पष्ट ,तिघात चौथा नकोच
भेट झाली म्हणजे आघाडी होत नाही
मुंबई,प्रतिनिधी
औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही. ज्यांची छुपी युती आहे ती त्यांना लखलाभ असो, असं सांगतानाच औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?
त्यांच्यासोबत युती होणार नाही, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत एमआयएमसोबतच्या युतीची शक्यता फेटाळली लावून आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो असेही राऊत यांनी म्हटले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही असेही त्यांनी म्हटले.
भेट झाली म्हणजे आघाडी होत नाही
एमआयएम ही भाजपची बी टीमच आहे. हे उत्तर प्रदेशात स्पष्ट झालं. बंगालमध्ये आम्ही पाहिलं. ज्यांना भाजपचा पराभव उत्तर प्रदेशात करायचा होता तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकायला हवी होती, असं सांगतानाच इम्तियाज जलील हे खासदार आहेत. दिल्लीत आमची त्यांच्याशी भेट होते. कुणासोबत भेट झाली म्हणजे आघाडी झाली असं होत नाही. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप – एमआयएमची छुपी युती
एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तरप्रदेशात पाहिलं आहे. बंगालमध्ये पाहिलं आहे. जे भाजपसोबत छुप्या युतीने काम करत आहेत त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. एमआयएम भाजपची बी टीमच आहे हे उत्तरप्रदेशातील निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. जर त्यांना उत्तरप्रदेशात भाजपचा पराभव करायचा होता तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकायला हवी होती.