बारामती तालुक्यातल्या सुपा परिसरात चार रानगव्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये घबराहटीचे वातावरण..
पाहण्यासाठी लोकांची गर्दी
बारामती तालुक्यातल्या सुपा परिसरात चार रानगव्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये घबराहटीचे वातावरण..
पाहण्यासाठी लोकांची गर्दी
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सुपे, काळखैरेवाडी जवळ शासकीय विश्रामगृहा समोर अचानक चार रानगवे आढळल्याने सुपे व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे..
म्हशी सारखा दिसणारा रानगवा प्राणी बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सुपे भागात दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.. चार रानगवे समूहाने रस्ता दिसेल तिकडे सैरावैरा धावत होते त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढल्याने हे रानगवे मयुरेश्वर अभयारण्यालगतच्या ऊसाच्या शेतात धूम ठोकली, या ऊसाच्या शेतालगत वन कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला आहे..