अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
टीसी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रंगणार कॉर्फबॉलचा थरार
अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
टीसी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रंगणार कॉर्फबॉलचा थरार
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच टीसी महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. दे
शभरातून 14 विद्यापीठांचे संघ या स्पर्धेसाठी मैदानात उतरले आहेत. असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी सुमारे 300 खेळाडू, संघव्यवस्थापक, क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक, पंच, शारीरिक शिक्षण संचालक सहभागी झाले आहेत.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमासाठी डॉ.दिपक माने, संचालक, बोर्ड ऑफ स्पोर्टस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर यांनी अध्यक्षस्थान भूषवले.. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रविणजी मानवतकर, खजिनदार, कॉर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, आणि देव बल्हारा,
टेक्निकल हेड, कॉर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांची सन्माननिय उपस्थिती होती. महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख गौतम जाधव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थीनी पुजा मधुकर पांढरे हीने सर्व खेळाडूंना शपथ दिली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी
बोलताना डॉ.दिपक माने यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि कॉर्फबॉल हा क्रीडाप्रकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खेळाडूंना केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला दिला. बारामतीमधील निरामय मेडिकल फाऊंडेशनकडून खेळाडूंसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे आभार प्राध्यापक अशोक देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप सरोदे आणि प्रा. स्मिता गोरे यांनी केले..