महागाईने गोर-गरीब हैराण;पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरही महागला
मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती.
महागाईने गोर-गरीब हैराण;पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरही महागला
मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती.
नवी दिल्ली,प्रतिनिधी
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
सर्वसामान्य जनतेचा खिसा आजपासून कापला जाणार महागाईची झळ आणखी तीव्र होणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
महाराष्ट्रात कोणत्या शहरात किती महागला सिलेंडर (आजचे दर)
पुणे – 952.5
नागपूर – 1,001.5
नाशिक – 953
औरंगाबाद – 958.5
मुंबई – 949.5
या कारणामुळे वाढले दर
4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच 6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तेल खरेदी कंपन्यांनी कच्च्या तेलाची ही महागाई ग्राहकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी इंधनाच्या दरात वाढ झाली.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते.