राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी होणार गिरवी व काटी येथे २० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात करोडो रुपयांचा विकास निधी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी होणार गिरवी व काटी येथे २० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात करोडो रुपयांचा विकास निधी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे गिरवी व काटी येथे रविवारी (दि.२७) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते २० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर हे असणार आहेत.
सदरील निधीतून काटी-रेडा-रेडणी रस्ता, वरकुटे-काटी-नीरा भीमा कारखाना रस्ता, काटी येथील ओढ्यावरील पूल तसेच काटी आणि गिरवी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
याप्रसंगी गिरवी व काटी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.दरम्यान दुपारी १ वाजता गिरवी येथे तसेच सायंकाळी ७ वाजता काटी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.