स्थानिक

सांगवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.मनिषा तावरे तर उपाध्यक्षपदी श्री स्वप्निल तावरे यांची एकमताने निवड !

समितीमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले.

सांगवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.मनिषा तावरे तर उपाध्यक्षपदी श्री स्वप्निल तावरे यांची एकमताने निवड !

समितीमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले.

बारामती वार्तापत्र

येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी संदर्भात नूतन गटशिक्षणाधिकारी माननीय श्री संपतराव गावडे साहेब यांच्या सूचनेवरून आज पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पालक मेळाव्याचे अध्यक्षस्थान सरपंच श्री चंद्रकांत तावरे यांनी भुषविले.तर बारामती पंचायत समितीचे केंद्रप्रमुख श्री संपत किसन जरांडे व श्री रमेश भगवंत गिरमे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

शिरवली केंद्राच्या केंद्रप्रमुख शोभा सावंत यांसह शाळेतील सर्व मुलांचे पालक तसेच महिला वर्ग यावेळी बहुसंख्येने उपस्थित होता. ज्यांची मुले शाळेत येतात त्या पालकांमधून सर्व व्यवस्थापन समिती सदस्यांची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवड करण्यात आली. या समितीमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले.

निवडीनंतर निवडलेल्या सदस्यांमधून सौ मनिषा सचिन तावरे यांची अध्यक्ष म्हणून तर श्री स्वप्निल हनुमंत तावरे यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

तन व्यवस्थापन समिती पुढील प्रमाणे :-
१) सौ मनिषा सचिन तावरे – अध्यक्ष
२) श्री स्वप्निल हनुमंत तावरे – उपाध्यक्ष
३) सौ वर्षा दिपक तावरे – सदस्य
४) सौ रोहिणी अजित तावरे – सदस्य
५) सौ वृषाली महेंद्र देशमुख – सदस्य
६) सौ कोमल प्रवीण फडतरे – सदस्य
७) सौ ललिता अतुल सोडमिसे – सदस्य
८) सौ संजना वैभव दोभाडा – सदस्य
९) सौ ज्योती पांडुरंग आडके – सदस्य
१०) सौ शुभांगी प्रदीप जगताप – सदस्य
११) श्री कल्याण बाळासो तावरे – सदस्य
१२) श्री धनंजय हनुमंत तावरे – सदस्य
१३) श्री राहुल दिलीप तावरे – सदस्य
१४) श्री समीर मारुती तावरे – सदस्य
१५) श्री राजेंद्र सदाशिव तावरे सदस्य
१६) श्री चैतन्य हनुमंत तावरे – शिक्षणप्रेमी सदस्य
१७) श्री प्रणव रवींद्र तावरे – ग्रामपंचायत प्रतिनिधी
१८) श्री मारुती संपत जगताप – शिक्षक प्रतिनिधी
१९) सौ छाया सुनिल गायकवाड – सदस्य सचिव

नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे जि प सदस्या सौ.मिनाक्षीताई तावरे , सरपंच श्री चंद्रकांत तावरे ग्रामपंचायत सदस्य
श्री. विजयराव तावरे, श्री. हनुमंत तावरे (मामा ) , विलास आडके , श्री.लोंढे आदि मान्यवरांनी तसेच सर्व ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button