मोठा दिलासा ; राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना पुणे मोक्का न्यायालयाने आज जामीन मंजूर
सुनावणी कडे बारामतीकरांचे लक्ष लागलेले होते.

मोठा दिलासा ; राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना पुणे मोक्का न्यायालयाने आज जामीन मंजूर
सुनावणी कडे बारामतीकरांचे लक्ष लागलेले होते.
बारामती वार्तापत्र
बारामती जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले माजी सरपंच जयदीप तावरे यांना पुणे येथील मोक्का न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.
जखमी रविराज यांनी गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांच्या कटकारस्थानात जयदीप यांचा सहभाग आहे, असा जबाब पोलिसांना दिला होता. त्यानुसार तपास अधिकारी तथा उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी एक महिन्यापुर्वी जयदीप यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली होती.
परंतु दरम्यानच्या कालावधीत पोलिस तपासामध्ये जयदीप यांचा वरील गोळीबार प्रकरणात कसलाच सहभाग अढळून आला नाही, अर्थात तसा अहवाल संबंधित तपास अधिकारी शिरगावकर यांनी मोक्का न्यायाधीश जेपी अगरवाल यांच्यासमोर आज सुपुर्द केला.
आज सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एडवोकेट सचिन वाघ यांनी जयदीप तावरे यांच्या वतीने बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून कोर्टाने असे मत व्यक्त केले की जयदीप तावरे हे रविराज तावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कट करणारे मुख्य सूत्रधार असल्याचा सध्यातरी कोणताही ठोस पुरावा नाही तसेच त्यांच्यावर मोक्का कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत.
वा वाघ यांनी जामीन, मोका आणि कलम 169 चा रिपोर्ट या तीनही बाबी वेगवेगळ्या असून उच्च न्यायालयाने यापूर्वीच यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
तसेच जामीन अन कायद्याची सहिंते चे कलम 169 वेगळे असून अद्याप पर्यंत मोक्का कायद्या प्रमाणे ची मंजुरी जयदीप यांना नसल्या मुळे मोक्का कायद्या च्या तरतुदी लागू होत नाहीत.
आरोपी साडेचार महिने तुरुंगात आहे म्हणून त्याला अटी शर्ती व अटी जामीन देण्यात आलेला आहे फिर्यादीचे वकील यांनी जामीन अर्जाला विरोध केला व तपास अधिकारी यांनी योग्य तो हुकूम करण्याची विनंती केली.
दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर ३१ मार्च रोजी गोळीबार झाला होता. त्यावेळी पोलिसांनी प्रथमदर्शनी उपलब्ध झालेल्या फिर्य़ादिच्या आधारे चार आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली होती.
अद्याप अटक असलेल्यांमध्ये प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव ( सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती ) समावेश आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर जयदीप तावरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जयदीप तावरे त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. मात्र मोका कोर्टाने यासंदर्भात दिलेल्या निर्देशानंतर जयदीप तावरे हे पोलिसांना शरण गेले होते.