स्थानिक
अर्चना दराडे यांची मोटार वाहक निरीक्षक पदी निवड
जनतेची सेवा करू असे निवडी नंतर अर्चना दराडे यांनी सांगितले.
अर्चना दराडे यांची मोटार वाहक निरीक्षक पदी निवड
जनतेची सेवा करू असे निवडी नंतर अर्चना दराडे यांनी सांगितले.
बारामती वार्तापत्र
अर्चना ज्ञानदेव दराडे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या मोटार वाहक निरीक्षक परीक्षेमध्ये यश मिळाले असून राज्यात मुली मध्ये प्रथम येण्याचा बहुमान तिला मिळाला आहे.
बी ई मॅकनिक असे शिक्षण झाले असून शेतकरी कुटूंबाची पार्श्वभूमी आहे वडील ज्ञानदेव व आई शोभा दराडे हे शेतकरी असून भाऊ अमोल व राजेंद्र दराडे हे व्यवसाईक आहेत रुई, वंजारवाडी ग्रामस्थांच्या वतीने निवडी बदल सन्मान करण्यात आला या वेळी रामहारी चौधर,माऊली चौधर,राहुल शिरसट,विजय चौधर ,भारत झांबरे,मनोज चौधर,निखिल खाडे, आदी मान्यवर उपस्तीत होते.
या यशामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद असून शासनाच्या व कायद्याच्या नियमानुसार जनतेची सेवा करू असे निवडी नंतर अर्चना दराडे यांनी सांगितले.