मुंबई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा साधेपणा पुन्हा ,विमानतळावर सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे

राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या साधेपणाचं आणखी एक उदाहरण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा साधेपणा पुन्हा ,विमानतळावर सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे

राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या साधेपणाचं आणखी एक उदाहरण

मुंबई, प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या सामाजिक जाणिवेचा आणि त्यांच्या दांडग्या राजकारणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला आहे. एखादी व्यक्ती राजकारणात शिरली, यशस्वी झाला की तिच्या डोक्यात सत्तेची नशा चढते. मात्र, आकाशाला गवसणी घालूनही जमिनीशी नाळ जोडलेली व्यक्ती आताच्या परिस्थितीत दिसणं दुर्मिळच.

मुंबईच्या विमानतळावर आज  शरद पवारांचा आता आणखी एक साधेपणा समोर आला आहे. देशातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले व्हीव्हीआयपी नेते असतानाही पवार विमानतळावर सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहिलेले दिसले. त्यामुळे पवारांचा साधेपणा लोकांसमोर आला आहे. पवारांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.

आज सकाळी यूके ९७० मुंबई ते दिल्ली फ्लाईटच्या बोर्डिंगवेळी शरद पवार नावाच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा हा साधेपणा अनेकांच्या मनाला भावून गेला.

आज सकाळी शरद पवार मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी निघाले, मुंबई विमानतळावर पोहचात त्यांनी कुठचाही बडेजावपणा न दाखवता रांगेत उभं रहाणं पसंत केलं. मागेपुढे कोणताही लवाजमा नव्हता, तर चालताना काचेचा आधार घेत त्यांनी विमानात प्रवेश केला. यावेळचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोटो काय सांगतो?

आज सकाळी शरद पवार दिल्लीला निघाले होते. त्यासाठी मुंबई विमानतळावर आले होते. युके 970 मुंबई ते दिल्ली फ्लाईटच्या बोर्डिंगवेळी पवार रांगेत सर्वसामान्यांप्रमाणे उभे असल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली विमानतळावर बोर्डिंगची भली मोठी रांग लागलेली होती. पवार या रांगेत उभे असल्याचं दिसतं. त्यांच्या हातात पेपर असून तोंडाला मास्क लावल्याचं दिसतं. त्यांच्या मागे आणि पुढे काही लोक उभे असल्याचंही दिसतंय. विशेष म्हणजे पवार काचेचा आधार घेत बोर्डिंगच्या रांगेत उभे होते. कोणताही बडेजाव न करता आणि व्हीआयपी संस्कृती बाजूला ठेवून पवार सर्वसामान्यांसारखे रांगेत उभे असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. एकीकडे व्हीआयपी असल्याचं सांगून विमान लेट केल्याच्या अनेक बातम्या वाचायला ऐकायला मिळत असतानाच पवारांच्या या साधेपणाने अनेकांची मने जिंकली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram