पुणे

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 74 कोटींची तरतूद केल्याबद्दल मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान विकासासाठी संपूर्ण मदतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंदिर देवस्थान समितीला ग्वाही

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 74 कोटींची तरतूद केल्याबद्दल मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान विकासासाठी संपूर्ण मदतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंदिर देवस्थान समितीला ग्वाही

मुंबई,प्रतिनिधी

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकास अराखड्यासाठी अर्थसंकल्पात 73 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्ठमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले तसेच आभार मानले. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी दिली.

श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्ठमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 725 व्या समाधी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील सासवड येथील संत सोपानकाका महाराजांचे समाधीस्थळ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे, त्याबद्दलही देवस्थान समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करुन आभार मानले. यावेळी श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, विठ्ठल मंदिर रुक्मिणी समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुलवड, शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड माधवी निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram