मुंबई

भाजप नेते किरीट सोमय्या पिता – पुत्रावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल,युद्धनौकेचा निधी लाटल्याचा आरोप

मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल

भाजप नेते किरीट सोमय्या पिता – पुत्रावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल,युद्धनौकेचा निधी लाटल्याचा आरोप 

मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल

मुंबई ;प्रतिनिधी

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी सोमय्यांनी जमा केलेला निधी हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी बाप-लेकानी 2013-14 मध्ये एक अभियान चालवलं होतं. त्यावेळी पिता-पुत्रांनी नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केला होता. बाप-लेकांनी जमा झालेला निधी राज्यपाल यांच्या सचिवाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु तो निधी राज्यपाल सचिवांकडे जमा न करता त्यांनी अपहार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही तक्रार एका माजी सैनिकांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्यावरती कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आज प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

काय आहे प्रकरण?

किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती.आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो.  यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.

भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram