एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला,शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन, राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
एका गटाने आंदोलन करत थेट चप्पल फेक केल्याची घटना घडली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला,शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन, राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
एका गटाने आंदोलन करत थेट चप्पल फेक केल्याची घटना घडली आहे.
मुंबई: प्रतिनिधी
गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला. सरकारने आणि न्यायालयाने एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सांगितल्यानंतर आपल्या मागणीवर ठाम असलेल्या आणि संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जोरदार धडक दिली. ‘शरद पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पण तरीही आंदोलक त्यांच्या घराच्या परिसरात आले आणि त्या ठिकाणी चप्पल फेक करत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. हे पोलीस यंत्रणा असेल वा राज्यातील गुप्तचर यंत्रणेला कसं काय समजलं नाही, किंवा त्याची कुणकुण कशी काय लागली नाही याचे आश्चर्य व्यक्त केलं जातं.
आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. यावेळी त्या घरामध्ये शरद पवारांच्या पत्नी आणि नात असल्याचं सांगितलं जातंय.