राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निमगाव केतकीत उद्या २१ कोटी ४१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटने
इंदापूर तालुक्यात चौफेर विकासाची गंगा वाहू लागली !
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निमगाव केतकीत उद्या २१ कोटी ४१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटने
इंदापूर तालुक्यात चौफेर विकासाची गंगा वाहू लागली !
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी (दि.१०) निमगाव केतकी येथे २१ कोटी ४१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजने संपन्न होणार आहेत.
इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून दिवसेंदिवस करोडो रुपयांचा विकास निधी मंजूर केला जात आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या चौफेर जणू काय विकास गंगाचं वाहू लागली की काय असेच चित्र आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले,पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले,दिपक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ डोंगरे, माजी सभापती दत्तात्रय शेंडे, सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र चांदणे, निमगाव केतकी चे माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदिप भोंग, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल मिसाळ, सुवर्णयुग संस्थेचे विश्वस्त भारत मोरे, निमगाव केतकी चे सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच मीना भोंग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे.
सदरील निधीच्या माध्यमातून लोणी देवकर-निमगाव केतकी ते रामकुंड शेटफळ हवेली रस्ता, निमगाव केतकी ते लोणी देवकर रस्तावर पूल बांधणे व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तसेच निमगाव केतकी येथील विविध विकास कामे होणार आहेत.