तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरच्या एका मल्लाने मानाचा महाराष्ट्र केसरी किताब; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा

पृथ्वीराजने विशाल बनकरचा स्पर्धेत 5-4 अशा गुणांनी पराभव केला आहे.

तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरच्या एका मल्लाने मानाचा महाराष्ट्र केसरी किताब; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा

पृथ्वीराजने विशाल बनकरचा स्पर्धेत 5-4 अशा गुणांनी पराभव केला आहे.

प्रतिनिधी

महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने बोलून दाखवली. काल शनिवारी झालेल्या स्पर्धेत इतिहास घडला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नव्हती. परंतु, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला साताऱ्यात सुरुवात झाली. त्यानंतर आपल्या समोरील पैलवानांचा पराभव करत विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील अंतिम लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र,अवघ्या १९ वर्ष वयाच्या पृथ्वीराजने कोल्हापुरचं नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले.

पण त्याला बक्षीसच न दिल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले. साता-यात झालेली उपेक्षा ही गंभीर असल्याचे सध्या बोलले जातय. या प्रकारावर जागतीक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या सोनबा गोंगाने याने सुद्धा आवाज उठवलाय. कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातुन येतात यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

कोण आहे पृथ्वीराज पाटील?

पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापूरातील जालिंदर आबा मुंडे शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला आहे. सध्या पृथ्वीराज आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये आपली ट्रेनिंग घेत आहे.

Related Articles

Back to top button