मुंबई

किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला;पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार

हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आव्हानही राऊत यांनी केलं.

किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला;पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार

हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आव्हानही राऊत यांनी केलं.

मुंबई:  प्रतिनिधी

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. युद्धनौका ‘विक्रांत’साठी जमा करण्यात आलेल्या पैशांमध्ये अपहार केल्याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर आज नील सोमय्यांनाही अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आएनएस विक्रांत प्रकरणात किरीट आणि नील सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर एका माजी सैनिकाच्या तक्रारीनंतर सोमय्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस दोघांनाही अटक करण्याची शक्यता होती. त्यातच आता किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ मुलगा नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने पिता-पुत्रावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे.

सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी समन्स

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होतं. मात्र सोमय्या पिता-पुत्र काल चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं होतं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, ते चौकशीला हजर राहू शकले नाहीत.

सोमय्या यांच्या वकिलांनी काल याबाबत माहिती देताना सांगितले होते की, ‘आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्रं दिलं आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहतील.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram