मुंबई

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात आर्थर रोड तुरुंगातून साताऱ्याकडे रवाना..!

काल सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात आर्थर रोड तुरुंगातून साताऱ्याकडे रवाना..!

काल सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकया निवासस्थानी घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. चिथावणीखोर भाषण करत कामगारांची माथी भडकवल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी काल सत्रसदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा घेतला आहे.

मुंबईतील आर्थर रोड कारागृह परिसरातून गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं. सातारा पोलीस गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचणार आहेत. साताऱ्यात पोहोचण्यास उशीर झाल्यास सदावर्ते यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सदावर्ते यांच्यावर दीड वर्षांपूर्वी फलटणमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.त्यामुळे सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

साताऱ्यातलं प्रकरण काय?
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. तेढ निर्माण होईल, असं ते वक्तव्य असल्याने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. दीड वर्षांपूर्वीची ही तक्रार असून त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. आता या गुन्ह्याप्रकरणी सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Back to top button