उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यात वीजेची टंचाई, काटकसरीने वापर करा’
जेवढ्या पैशाचा रिचार्ज केला जाईल तेवढीच वीज संबधितांना वापरता येईल
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यात वीजेची टंचाई, काटकसरीने वापर करा’
जेवढ्या पैशाचा रिचार्ज केला जाईल तेवढीच वीज संबधितांना वापरता येईल
बारामती वार्तापत्र
वीजेची सध्या चणचण भासत आहे. काय होणार ही चिंता आहे. कोळश्याची टंचाई निर्माण झाली आहे. परदेशातून कोळसा आयात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वीजेचा भारही वाढला आहे. मागणी वाढली आहे. बाहेरील राज्यातून वीज घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाणी वीजेसाठी वापरणार आहोत. दुसरीकडे, तुम्ही वापरत असलेल्या वीजेचे बील भरले पाहिजे, असे ते म्हणाले. माळेगावमध्ये वीजेचे माळ सुरू होती. हायमास्टही चालू होता. पण आता हायमास्टला बंदी घातली आहे. राज्यात काही ठिकाणी दिवसाही दिवे चालू ठेवतात. त्याचे पऱिणाम भोगावे लागतात, असे ते म्हणाले.
‘प्रिपेड पद्धतीने देणार वीज’
शेतकऱ्यांना अडचणींतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. वीजेच्या बाबतीतही काही निर्णय घेतले आहेत. आता वीज प्रिपेड पद्धतीने देणार आहे. गरज असेल तशी वीज वापरा. आता आकडा बंद. आकडा टाकून टाकून आमची वाट लागली. वीजबिल न भरणारांचा भार हा नियमीत बील भरणारांवर येतो.