अखेर ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथे सभा,’या’ अटी-शर्तींसह!
आयुक्तांसोबत सकारात्मक बैठक झाल्याचं त्यांनी म्हटलं.
अखेर ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथे सभा,’या’ अटी-शर्तींसह!
आयुक्तांसोबत सकारात्मक बैठक झाल्याचं त्यांनी म्हटलं.
प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी येत्या ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे. याआधी त्यांनी मुंबईत सभा घेतली होती. त्यानंतर ठाण्याच्या उत्तरसभेत मनसेचा अजेंडा स्पष्ट केला. अखेर महाराष्ट्र दिनाला त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं सांगितलं.
अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाणार असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे.
तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. तसेच, मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी औरंगाबादेतील मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचीही भेट घेतली.
राज ठाकरेंच्या सभेसाठी ‘या’ अटी-शर्थी :
- ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
- लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
- इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
- 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
- व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
- सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
- वाहन पार्किंगचे नियम पाळावे
- सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
- सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
- सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये