क्राईम रिपोर्ट

बारामती शहर पोलीस स्टेशन कडून एक्टिवा गाडी सहा गुटखा जप्त

11 टपरी वरील कारवाई

बारामती शहर पोलीस स्टेशन कडून एक्टिवा गाडी सहा गुटखा जप्त

11 टपरी वरील कारवाई

बारामती वार्तापत्र

राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही अवैध मार्गाने गुटखा आणून त्याची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे अवैध धंद्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. श्री.महाडिक यांनी शहरात गस्तही वाढवली आहे.

आज मध्यरात्री पिंपळी गावच्या हद्दीमध्ये इंदापूर रोडवर एक्टिवा गाडी वर इसम नामे किशोर जितेंद्र धोत्रे वय 23 वर्ष राहणार कन्हेरी धोत्रे वस्ती हा बारामती कडून कनेरी कडे गुटखा घेऊन जात असताना पोलिसांच्या गस्ती पथकास मिळून आला पोलिसांनी त्याची झडती घेतली असता साडेसात हजार रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा पुड्या त्याच्याकडे मिळून आल्या त्याची 70 हजार रुपये किमतीची ॲक्टिवा साडेसात हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्त पथकाचे पोलीस हवालदार शिंदे बंडू कोठे पोलीस नाईक दशरथ कोळेकर व कल्याण खांडेकर यांनी केलेली आहेत सदर आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊन त्याच्यावर भादवि कलम 328 व अन्नभेसळ कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय गणेश इंगळे सो यांच्या 11 टपरी वरील कारवाईनंतर बारामती शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे सदर आरोपीला तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

Related Articles

Back to top button