राणा दांम्पत्याला दोन दिवस तुरुंगातच काढावी लागणार ‘या’ दिवशी होणार सुनावणी
जामीन अर्जावरील निर्णय बुधवारपर्यंत लांबणीवर.

राणा दांम्पत्याला दोन दिवस तुरुंगातच काढावी लागणार ‘या’ दिवशी होणार सुनावणी
जामीन अर्जावरील निर्णय बुधवारपर्यंत लांबणीवर.
मुंबई – प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्याबाबची सुनावनी आज न्यायालयात पार पडली. राणा दाम्पत्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. 4 मे रोजी आता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी आपल्या वकिलांकरवी भायखळा कारागृह अधीक्षकांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात स्पॉन्डीलायटिसच्या त्रासाबाबत अवगत केले आहे. ‘ कोठडीत सतत लादीवर बसावं लागत असल्याने माझं दुखणं वाढलं आहे. २७ एप्रिल रोजी मला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले असता सिटीस्कॅन करण्याची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आजारपण वाढल्यास त्याला पूर्णपणे कारागृह प्रशासन जबाबदार असेल ‘, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांचे महासंचालकांना पत्र – दिल्ली पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या तक्रारीबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना एक पत्र पाठवले आहे. त्यात लिहले की, नवनीत राण आणि रवी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केलेली तक्रार तुम्हाला पाठवली जात आहे. तुमच्याकडून आवश्यक ती कारवाई केली जावी, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले.