इतर कुणीही शहाणपणा करू नये ,राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
म्हणाले इतर भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष असलेले कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या विरोधात शड्डू ठोकलेत.शहाणपणा करू नये ,राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
इतर कुणीही शहाणपणा करू नये ,राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष असलेले कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या विरोधात शड्डू ठोकलेत.
मुंबई : प्रतिनिधी
अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंनी पक्षाच्या लोकांसाठी नवं फर्मान जारी केला आहे. प्रवक्त्यांशिवाय इतर कुणी बोलू नये. मनसेने प्रवक्ते नेमलेत, फक्त तेच बोलतील. इतर कुणीही शहाणपणा करू नये असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी म्हटलंय की, “पक्षाच्या प्रवक्त्यांशिवाय इतर कोणीही यावर बोलण्याचा शहाणपणा करु नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी वा इतरांनी काही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे.”
जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे असा दमही राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर वाद सुरू असून उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदारांनी राज ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यावर मनसेतील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने मनसे नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या अडचणीच्या ठरु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच राज ठाकरेंनी हे पत्र जारी केल्याचंही सांगितलं जातंय.