शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचा जोरदार घणाघात; म्हणाले ‘मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी हा बारामतीला’
‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचा जोरदार घणाघात; म्हणाले ‘मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी हा बारामतीला’
‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’
प्रतिनिधी, नाशिक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भगव्यातून हिरव्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी हा बारामतीला आहे, अशी टीका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नववा महिना लागला आहे की काय, असा निशाणाही खोत यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसवर साधला आहे. ते येवला येथे आयोजित शेतकरी संवाद दौऱ्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
करोनाच्या नियोजनासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार तोंडघशी पडले आहे. ठाकरे सरकार सध्या बारामतीच्या इशाऱ्यावर चालते आहे. मंत्री स्वत:ची दुष्कृत्ये आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी विविध मुद्द्यांना हवा देऊन मूळ प्रश्नांपासून पळ काढत आहेत. राज्यात शरद पवार यांनीच जातीयवाद पसरवून सहकार चळवळीचे वाटोळे केले, अशा परखड शब्दांत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महाआघाडी सरकारवर टीका केली.
मराठा आरक्षण बारामतीनेच घालविले
मराठा समाजाचे आरक्षण घालविण्यासाठी केवळ बारामतीचे पवार आणि पवार कंपनीच कारणीभूत असल्याचाही आरोप खोत यांनी केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना जातीयवादी ठरविण्यासाठी राज्यात नियोजनबद्ध मोर्चे काढण्यात आले. फडणवीस आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करीत होते त्यांनाच घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येक समाजातून एक नेता हेरून त्याला राजकारणात लाभाचे वाटेकरी करण्याचे राजकारण बारामतीकरांनी खेळले. याचे पडसाद नाशिकच्या एनडीसीसीपर्यंत बघायला मिळतील. बँकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊनदेखील कुणावरही कारवाई नाही, या घटनांचे मथितार्थ समजायला हवेत. शरद पवारांपासून महाराष्ट्र वाचविण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल, अशी टीकाही त्यांनी केली.
“मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी बारामतीत” – सदाभाऊ खोत म्हणाले की, मला वाटते की मुख्यमंत्री हे भगव्यातून आता हिरव्यात आलेले आहेत. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न बाळगलेले होते त्या स्वप्नाचा चक्काचूर करण्याचे काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलेले होते. मात्र, विश्वास घात करुन ते सत्तेवर आले. त्यांच्या बोलवता धनी हा बारामतीला आहे. मुख्यमंत्री नामदार सारखे नामदारी आहेत. जसे एखादे बियाणे पेरल्यानंतर उगवते नसते तसे मुख्यमंत्री काही बोलले तर त्याला पीक येत नाही. त्यांच्या बोलण्याला काही सुद्धा अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांनी जरा घराच्या बाहेर पडावे. कोरोनाच्या काळात सुद्धा गावगाड्याचा माणूस शेतामध्ये राबत होता. तुम्ही मात्र अजून मास्क लावून आपल्याला काय होईल का?, झाले तर आपल्या संपत्तीचा काय करायचे या चिंतेने ते स्वतःची काळजी घेत आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोतांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
“राज्याचे वाटोळे पवार अँड पवार कंपनीने केले” – राज्यात दूध, कांदा दर प्रश्न गंभीर झाला आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही. सरकार सध्या बारामती वरून चालतेय. मराठा आरक्षण देखील बारामतीकरांनी घालवले. मराठा समजाचे वाटोळे या बारामतीकरांनी केले. राज्याचे वाटोळ या पवार अँड पवार कंपनीने केल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच, राज्याला आता पवार फॅमिलीपासून यांच्यापासून वाचवण्याची वेळ आल्याचा घणाघात खोत यांनी केला आहे.