बारामती शहरातील मटका अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र
मोबाईल मध्ये व्हाट्सअप मध्ये मिळालेल्या ग्रुप वरील सर्व मोबाईल नंबर धारकांना या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.
बारामती शहरातील मटका अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र
मोबाईल मध्ये व्हाट्सअप मध्ये मिळालेल्या ग्रुप वरील सर्व मोबाईल नंबर धारकांना या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.
क्राईम; बारामती वार्तापत्र
अनंत अशा नगर दुर्गा टाकी समोर बाई माउशी यांचे पत्र्याचे शेड मध्ये या ठिकाणी बंद खोली मध्ये कल्याण व मुंबई मटका जुगार दररोज घेतला जातो अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. सदरची माहिती त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना सांगितली. पोलीस उपाधीक्षक यांच्याकडून सदर ठिकाणी जुगार अड्ड्यावर रेड करण्यासाठीचे वारंट त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोठे यांच्या नावे दिले.
दिनांक 9 मे रोजी सायंकाळी सदर मटका अड्ड्यावर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोठे पोलीस हवलदार भिमराव आहेर चालक सहाय्यक पोलीस फौजदार मोघे पोलीस हवालदार यशवंत पवार दशरथ इंगोले पोलीस शिपाई कांबळे महिला पोलीस नाईक गलांडे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारून बंद खोलीत मोबाईलवर मटका घेताना मोहन हरिभाऊ चव्हाण मनोज मोहन चव्हाण श्रीमती कौशल्या भीमराव जाधव हे लोक व रोख 2715 रुपये त्यामध्ये काही चिल्लर पाच हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाइल फोन ज्यावर बारामती शहरातील मटका एजंटचा एक ग्रुप असून त्यावर मटक्याच्या चिठ्ठ्या ची सांकेतिक भाषेत माहिती कळवली आहे टेबल फॅन तसेच दोन पाण्याचे जार असा एकूण नऊ हजार 740 रुपये किमतीचा मटका साहित्य मुद्देमाल मिळाला त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर मोबाईल मध्ये व्हाट्सअप मध्ये मिळालेल्या ग्रुप वरील सर्व मोबाईल नंबर धारकांना या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. सदरचा मोबाईल सायबर तज्ञाकडे पाठवून डिलीट झालेले मेसेज सुद्धा काढण्यात येणार आहेत. पोलीस ठाण्याचा सदर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सतत सुरू आहे. पोलीस ठाण्यात अवैध धंद्या बाबतीत जनरल निवेदन न देता अवैध धंदे करणारे लोक व ठिकाण यांची स्पेसिफिक माहिती द्यावी . आपले नाव कुणालाही सांगितले जाणार नाही याची आम्ही खात्री देतो. एवढं करून जर आपल्याला शंका असेल तर आपण डायल 112 ला माहिती द्यावी.