मुंबई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट ;केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट ;केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई- प्रतिनिधी

मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने एक कविता फेसबुकवरुन शेअर केली आहे. त्यानंतर तिच्या विरोधात कळवा येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.

केतकीनं ही पोस्ट केली आहे.

सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. केतकीने आता तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटे यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!