इंदापूर

लोणी देवकर हद्दीत घडलेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर बस जळून खाक

बस मधील प्रवासी बचावले मात्र सर्व वस्तू जळून खाक

लोणी देवकर हद्दीत घडलेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर बस जळून खाक

बस मधील प्रवासी बचावले मात्र सर्व वस्तू जळून खाक

इंदापूर  : प्रतिनिधी

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.१२) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार तर एक लक्झरी बस जळून खाक झाली.याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

मनोज प्रभाकर कांचन (वय ३१वर्षे,रा. ऊरळी कांचन, ता. हवेली,जि.पुणे) असे या अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.अनिल कविराज पाटील (रा.मंगळुर,ता. जळकोट,जि. लातूर) असे आरोपी असणा-या टेम्पो चालकाचे नाव आहे.या प्रकरणी राहुल शंकर मेमाणे ( रा.कोरेगांव मुळ,इनामदारवस्ती,ता.हवेली,जि.पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी मेमाणे हे आपला मावसभाऊ मनोज प्रभाकर कांचन याच्या दुचाकीवरुन (एम.एच १२ पीके ०९२०) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन मोहोळ (जि. सोलापूर) येथे जात असताना लोणी देवकर गावच्या हद्दीत त्यांचे पाठीमागुन भरधाव वेगात सोलापूर बाजूकडे निघालेल्या अशोक लेलँड टेम्पो (एम.एच १४ जीडी ८५१४ ) ने दुचाकीस ठोस दिली.झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मनोज कांचन गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला.याच वेळी सोलापूरच्या दिशेने निघालेली लक्झरी बस (एम.एच ११ सीएच ६६७६) रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त दुचाकीवरुन जात असताना दुचाकी लक्झरी बसच्या खालच्या बाजुस अडकली व फरफटत पुढे जात असताना झालेल्या घर्षणाने दुचाकीने पेट घेतला. परिणामी लक्झरी बस ही पेटली.बसमधील प्रवाशांनी कसाबसा जीव वाचवला.परंतू बसमधील सामान, कपडे,पैसे व दागिने जळुन खाक झाले.अधिकचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!