इंदापूर

गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वैद्यकीय पथकाची इंदापूर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई

गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वैद्यकीय पथकाची इंदापूर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई

इंदापूर : प्रतिनिधी

वैद्यकीय पथक व पोलीसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत इंदापूर परिसरात बेकायदेशीररित्या गर्भलिंग परिक्षण करणा-या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करत,त्यांच्यावर शुक्रवारी (दि.१३) गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत दोन लिंगपरिक्षण यंत्रासह,मोबाईल संच व इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आरोपींमध्ये कोळेगाव (जि.सोलापूर) येथील एक डॉक्टर त्याची पत्नी व डॉक्टर असणा-या त्याच्या मुलाचा समावेश आहे. रा. राजाळे (ता.फलटण,जि. सातारा) येथील लॅब टेक्निशियन व वाहनचालकाचा समावेश आहे. डॉ.हनुमंत ज्ञानेश्वर मोरे,कमल हनुमंत मोरे (सर्व रा.कोळेगाव,ता.माळशिरस.जि.सोलापू र) प्रवीण पोपटराव देशमुख (वय ३२ वर्षे,लॅब टेक्निशियन),तौसिफ अहमद शेख (वय ३० वर्षे, वाहनचालक,दोघे रा.राजाळे ता.फलटण.जि.सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष खामकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

सविस्तर हकीकत अशी की, इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष खामकर यांना एम.एच ११ सी.जी.८०१६ या कारमध्ये गाडीमध्ये काही लोक फिरुन गर्भवती महिलांची बेकायदेशीर तपासणी करुन गर्भाचे लिंगपरिक्षण करत असल्याची माहिती मिळाली.त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, सहा.पो.निरीक्षक नागनाथ पाटील,सहा.फौजदार के.बी.शिंदे,हवालदार खंडागळे, पोलीस नाईक मोहिते, एएचटीयु पथकाचे पोलीस निरीक्षक चव्हाण,उपनिरीक्षक माधुरी देशमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष खामकर,बावडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.श्रीकृष्ण खरमाटे,इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल खनावरे यांचे पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले.

सुरवड गावच्या हद्दीत भांडगाव रस्त्याजवळ त्यांना संशयित कार आढळून आली.छापा टाकला असता त्या कारमध्ये दोन इसम एका गर्भवती महिलेची गर्भ तपासणी करताना मिळुन आले. त्यांची विचारपूस केली असता, प्रवीण पोपटराव देशमुख,तौसिफ अहमद शेख अशी त्यांची नावे असल्याची माहिती शोध पथकाला मिळाली.कारमध्ये दोन लिंगपरिक्षण यंत्रे, दोन मोबाईल व इतर वैदयकिय साहित्य मिळुन आले.ते पंचांसमक्ष जप्त केले.ताब्यात घेतलेल्या देशमुख व शेख यांची सखोल चौकशी केल्यानंतर कोळेगाव (जि. सोलापूर) येथील डॉ.सुशांत हनुमंत मोरे,डॉ.हनुमंत ज्ञानेश्वर मोरे व त्याची पत्नी कमल हनुमंत मोरे यांनी मिळून आत्तापर्यंत अनेक गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंगपरिक्षण केल्याचे व सुरवड येथे कारमध्ये आढळलेल्या गर्भवती महिलेला सुध्दा त्यांनीच तपासणीसाठी पाठवल्याचे उघड झाले.यानंतर पीसीपीएनडीटी कायदयाचे कलम २३,२५ व २९ नुसार इंदापूरच्या प्रथम वर्गदंडाधिका-यांच्या न्यायालयात डॉ.संतोष खामकर यांनी कायदेशीर फिर्याद दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!