उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते शैक्षणिक कर्जाचे मंजूरी पत्राचे वाटप
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे 50 लाख रूपयांचा निधी वितरीत

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते शैक्षणिक कर्जाचे मंजूरी पत्राचे वाटप
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे 50 लाख रूपयांचा निधी वितरीत
बारामती वार्तापत्र
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शिफारशीमुळे व आज त्यांच्या शुभहस्ते बारामती शहर व तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणार्या 20 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाचे मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले.
20 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जवळपास 50 लाख रूपयांची रक्कम आरटीजीएस द्वारे बँक खात्यावर जमा झालेली आहे. यावेळी ना.अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व महामंडळाचे पैसे वेळेवर परतफेड करण्याच्या सूचनाही दिल्या. यापुर्वी अशाच प्रकारचा निधी उच्च शिक्षणासाठी दिलेला असल्यामुळे ही योजना उत्तमरीत्या महाराष्ट्रात राबविली जात आहे.
मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी आतापर्यंत एक कोटीच्या वर निधी आणून विविध मुलांना याचा लाभ मिळवून दिला आहे.
यावेळी सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद व सुबहान कुरैशी यांनी पुष्पगुच्छ देवून दादांचे आभार मानले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे मुस्लिम ,जैन, ख्रिश्चन, नवबौद्ध, शीख, पारसी व ज्यू या जातीतील उच्च शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांनी आलताफ सय्यद मो.नं : 9665526001 यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.