इंदापूर

इंदापूर येथील कावडी सोहळ्याचे केदारनाथकडे प्रस्थान

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पूजन

इंदापूर येथील कावडी सोहळ्याचे केदारनाथकडे प्रस्थान

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पूजन

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर येथील शिवशंभो प्रतिष्ठानच्या कावडी सोहळ्याचे केदारनाथकडे सोमवारी (दि.१६) रात्री प्रस्थान झाले. तत्पूर्वी या कावडीचे पूजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कावडी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

शिवशंभो प्रतिष्ठानचे सुमारे ७० शंभोभक्त हे कावडी सोहळ्या सोबत केदारनाथ कडे निघाले आहेत. एकूण २० दिवसाचा हा प्रवास आहे. केदारनाथला कावड सोहळा दि.२४ मे ला पोहचणार आहे. प्रवासात औंढा नागनाथ, परळी, उज्जैन,ओंकारनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ आदी अनेक ठिकाणी कावड सोहळा जाणार असून दि. ५ जूनला सोहळा इंदापूर येथे परतणार आहे. या कावडी सोहळ्या सोबत शुभम पवार, गणेश नागपुरे, रोहित पाटील, राजू ताटे, संतोष जाधव, अशोक पवार आदी अनेक शिवभक्त आहेत.

कावड पूजन प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी शिवभक्तांची संवाद साधला. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी ४० फुटी रोड वरील शिवमंदिरात दर्शन घेतले. यावेळी मार्गदर्शक पोपट पवार, जगदीश मोहिते, प्रशांत उंबरे, कांतीलाल झगडे, पांडुरंग शिंदे,दत्तात्रय शिर्के आदींसह शिवभक्त व शिवशंभो प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button