दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना मोदी सरकारने कर कमी करत पुन्हा एकदा जनतेला मोठा दिलासा
देशात सर्वात जास्त म्हणजे 15 टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो.
दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना मोदी सरकारने कर कमी करत पुन्हा एकदा जनतेला मोठा दिलासा
देशात सर्वात जास्त म्हणजे 15 टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो.
नवी दिल्ली:प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत वाढती नाराजी पाहता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. सहा महिन्यांनंतर सरकारने दिलासा दिला आहे. यापूर्वी दिवाळीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर हा 8 रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा 6 रुपयांनी कमी करण्यात येत आहे.
त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.
गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
या आधीही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी कर कमी केला होता, त्यावेळी भाजप शासित राज्यांनीही करामध्ये कपात केली होती. आता केंद्राने दुसऱ्यांदा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्य सरकारं आता कोणती भूमिका घेणार, राज्यांतील कर कमी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निर्मला सितारमण काय म्हणाल्या?
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्त्व स्वीकारल्यानंतर गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. गरीब आणि मध्यमवर्गींच्या मदतीसाठी काम करत आहोत. गेल्या सरकारच्या तुलनेत आमच्या काळात सरासरी महागाई राहिला आहे. आम्ही आज पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर 8 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवरील अबकारी कर 6 रुपये प्रति लीटर कमी करणार आहोत. यामुळं पेट्रोल 9.5 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी कमी होणरा आहेत, असं सितारमण म्हणाल्या. तर, केंद्र सरकारच्या महसुलावर वार्षिक १ लाख कोटींचा परिणाम होणार आहे, असं त्या म्हणाल्या.