महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट चर्चांमध्ये काही तथ्य नाही ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती
ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा
महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट चर्चांमध्ये काही तथ्य नाही ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती
ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा
प्रतिनिधी
भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. तर महाराष्ट्रात शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याचं दिसून आलं. अशातच राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. काय म्हणाले टोपे?
राज्यात कोरोनाचा धोका किती आहे त्याचप्रमाणे चौथी लाटेची कितपत शक्यता आहे, यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले, कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. कोरोनाच्या रूग्णांची नोंद होतेय, कारण लोकं गर्दी करतायत, मेळावे भरतायत तसंच राजकीय कार्यक्रम होत असून इथे लोकं एकमेंकांना भेटतायत. मात्र अपेक्षेप्रमाणे रूग्णसंख्येत वाढ होत नाहीये.
ॲटीबॉडीजची टेस्ट करुन बूस्टर डोस घ्यावा – आरोग्यमंत्री
बूस्टर डोसबाबत केंद्राच्या सुचना आहे. त्यानुसार राज्यात बूस्टर डोस देण्यात येत आहेत. ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा असे आरोग्यमंत्री म्हणाले.
आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाच्या रूग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचं कारण नाहीये. कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही.