दर्जेदार कामे होण्यासाठी बिल्डर असोसिएशनने लक्ष देणे गरजेचे… उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्र सरकार जीएसटी बाबत खूप आग्रही आहे
दर्जेदार कामे होण्यासाठी बिल्डर असोसिएशनने लक्ष देणे गरजेचे… उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्र सरकार जीएसटी बाबत खूप आग्रही आहे
बारामती वार्तापत्र
बारामतीचा चौफेर विकास होत असताना नागरिकांच्या गरजाही बदलत आहेत शहराच्या विविध भागात अनेक दर्जेदार कामांची निर्मिती केली जात आहे. आगामी काळात स्वतंत्र जलतरण जलतरण तलाव बारामतीत उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बारामती बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात पवार बोलत होते याप्रसंगी बिल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष निमेशभाई पटेल,राज्याचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे उपस्थित होते.यावेळी अजितदादांच्या हस्ते बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विक्रांत तांबे यांनी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.श्यामराव राऊत उपाध्यक्षपदी आदेश वडूजकर सचिवपदी,ओमकार देवळे खजिनदारपदी सहसचिव म्हणून सुशील घाडगे गव्हर्निंग कन्सिल मेंबर संजय संघवी सुनील देशमुख आदींना पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
दरम्यान पवार यांनी बारामती बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुक करून शहराच्या विकासात सक्रीय योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच बिल्डर असोसिएशनच्या सदस्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या बाबतीत करावा असे आवाहन पवार यांनी केले.
यावेळी पवार यांनी असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष मुळे यांनी सोलापूर जिल्ह्याचा केलेला उल्लेख याचा धागा पकडून ज्या जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळाले उपमुख्यमंत्री पद मिळाले त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील पाण्याची काय व्यवस्था आहे तेथील खासदार देशाच्या संसदेत अक्षर काढत नाहीत असा टोला मारत तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो असे नमूद केले तसेच बांधकाम व्यवसायाशी संबंधित जीएसटी बाबत पवार म्हणाले जीएसटी कमी करण्याचा अधिकार राज्यांना नाही राज्यांना फार तर कौन्सिल पुढे मुद्दे मांडता येतात लोकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरू पाहणारे मुद्दे आम्ही तेथे मांडत असतो परंतु केंद्र सरकार जीएसटी बाबत खूप आग्रही आहे त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे असते तुमची अडचण होते हे मला कळते,परंतु जीएसटी कडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष नको असे पवार म्हणाले.
याप्रसंगी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत तांबे यांनी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून केलेल्या कामांचा तसेच समाजाप्रती असलेल्या दायित्वचा ऊहापोह करून इथून पुढे दर्जेदार व चांगली कामे केली जातील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल धुमाळ यांनी केले. तर आदेश शहा वडूजकर यांनी आभार मानले.