हेअर प्रॉडक्ट कंपनीत संचालक म्हणून घेतो असे सांगून भामट्या चा 62 लाख 57 हजार 973 रुपयांचा गंडा
भल्या पहाटे सदर आरोपी प्रवीण सदाशिव भिसे यांना पुण्यामध्ये अटक
हेअर प्रॉडक्ट कंपनीत संचालक म्हणून घेतो असे सांगून भामट्या चा 62 लाख 57 हजार 973 रुपयांचा गंडा
भल्या पहाटे सदर आरोपी प्रवीण सदाशिव भिसे यांना पुण्यामध्ये अटक
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामतीमधील तक्रार तुषार ओंबासे यांची ओळख आरोपी प्रवीण सदाशिव भिसे मूळ चा रेडमी तालुका इंदापूर याच्याबरोबर झाली त्याने त्यांना सांगितले की त्यांची टाईम फॉर इंडिया या नावाने शेअर प्रॉडक्ट करणारी कंपनी स्थापन करून चांगल्या प्रकारे नफा कमवून देतो त्यामध्ये आपल्याला संचालक म्हणून घेतो असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला व सन 2020 ते 21 या दरम्यान आरटीजीएस वरून एकूण 62 लाख 57 हजार 973 रुपयांचा गंडा त्याने फिर्यादी यांना लावला सदरचे पैसे त्याने त्याच्या व त्याची बहीण आयसीआयसी बँकेत कामाला असणारी तिच्या नावावर मागून घेतला.
सदर आरोपी ची बहिण दिपाली सदाशिव भिसे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी पुण्यामध्ये लपून-छपून स्वतःचा पत्ता बदलून राहात होता.
तक्रार यांनी माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ सूत्रे हलवून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दांडीले पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे पोलीस शिपाई तुषार चव्हाण वर अंजित देवकर यांनी गोपनीय माहिती काढून भल्या पहाटे सदर आरोपी प्रवीण सदाशिव भिसे यांना पुण्यामध्ये उचलून पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आलेली आहे प्राथमिक दृष्ट्या या आरोपीने पैसे काढून टाकलेले दिसत असून या प्रकारची कुठलीही कंपनी अस्तित्वात नाही या पुढचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दिले हे करत आहेत